Taxation Of Professionals
साधारणतः कंपन्या कोणालाही कामावर ठेवण्यासाठी मुलाखती घेतात, आणि व्यक्ती त्यांच्या दृष्टीने अनुरूप वाटली, तर मग नोकरीवर ठेवतात. अशा व्यक्तीला payroll वर घेतले तर तो "employee" होतो, व त्याला PF, ESI, PT, Gratuity इ. सर्व कायदे लागू होतात. पण अलीकडे "trend" जरा बदलला आहे. व्यक्तीला वरील प्रमाणे जर payroll वर घेतले तर हे भरमसाठ कायदे पाळावे लागतात; म्हणून त्यांना करारावर म्हणजेच contract वर घेण्याची नवीन पद्धत हल्ली रुजू झाली आहे. Contract वरील व्यक्ती ही त्या कंपनीची employee नसून स्वतंत्र contractor किंवा professional आहे, असे धरले जाते. त्यामुळे अशा व्यक्तीला दिलेला मोबदला हा पगार नसून, मानधन किंवा professional fees असतात. या professional fees देतांना त्या कंपन्या आयकर कायद्याच्या कलम 194J अंतर्गत 10% करकपात करतात. अशा professional fees संदर्भात साधारणपणे आम्हाला विचारण्यात येणाऱ्या शंका व त्यांचे स्पष्टीकरण खाली देत आहे- १. आम्हाला महिन्याला फक्त ७-८ हजारच मिळतात पण त्यातून ही 10% कपात करतात, असे का? तुम्ही पगारदार असता, तेव्हा तुमच्या tax saving गुंतवणूकींची तुम्ह...