Women's Day 2023
सोबत दिलेले चित्र नीट निरखून बघा. आपल्यापैकी किती लोकांनी सोन्याचे असे चकाकणारे बिस्कीट पाहिले आहे? सोन्याची झळाळी काही निराळीच असते , नाही का? आता जरा चित्राचा उजवा भाग बघा- काय सुरेख चाफ्याची फुले आहेत. आपल्यापैकी ज्यांनी चाफ्याच्या फुलांचा वास घेतला असेल, त्यांच्या डोळ्यासमोर (किंवा इथे नाकासमोर) लगेच ती आठवण आली असेल ना?
आज महिला दिनानिमित्त महिला कशा सुपर वुमन आहेत, महिला कशा सगळ्या गोष्टी करू शकतात हे ठिकठिकाणी वाचायला/ ऐकायला मिळेल. पण जर एखाद्यावेळी नाहीच जमले, ही अशी सगळी कामे करणारी सुपर वुमन व्हायला, तरी निराश व्हायचे काहीही कारण नाही. या सोन्याचे बिस्कीट व चाफ्याचे फूल आठवा व देवाचा/ निसर्गाचा संदेश नीट लक्षात ठेवा-
क्षणभर विचार करा- देवाच्या/ निसर्गाच्या मनात असते, तर सोन्याला चाफ्याचा सुवास देता आला नसता का? याचप्रमाणे चाफ्याला सोन्याची चमक, झळाळी देता आली नसती का? देवाला/ निसर्गाला काय अशक्य आहे? पण तसे घडलेले नाही. कारण अपूर्णत्वात ही सौंदर्य आहे, अपूर्णत्वात ही गोडी आहे! उगीचच ठिकठिकाणी बोललं गेलं "महिला सगळं करू शकतात" म्हणूनच सगळी ओझी स्वतः वाहिली पाहिजेत, असे अजिबात नाही. तुम्ही सोनं असाल, तर चमका, चाफा असाल तर सुगंध द्या; आपली क्षमता ओळखा व त्याप्रमाणे कार्य करा!
याआधी लिहिलेले लेख ही देत आहे-
https://capsdamle.blogspot.com/2021/03/womens-day.html
https://capsdamle.blogspot.com/2022/03/womens-day-2022.html
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा