UPI charges

एक एप्रिल 23 पासून UPI महागणार, आता 2000 वरच्या प्रत्येक transaction वर चार्जेस द्यावे लागणार-

अशा आशयाचे मेसेज फॉरवर्ड होत आहेत. *पण हे साफ चुकीचे आहे.*

एक एप्रिल 23 नंतर सुद्धा P2P म्हणजेच peer to peer व्यवहार (म्हणजे तुमच्या मित्र मंडळी, नातेवाईक यांना पैसे पाठवणे) आणि P2M म्हणजेच peer to merchant व्यवहार (म्हणजे UPI द्वारे दुकान इ. अस्थापनांना पैसे पाठवणे) यांना कोणतेही अतिरिक्त चार्जेस लागणार नाहीत. थोडक्यात *एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे UPI द्वारे पाठवित असाल, तर चार्जेस लागणार नाहीत.*

फक्त जे लोक Prepaid payment instrument (जसे की wallet, गिफ्ट कार्ड) चा वापर करतात, त्यांना चार्जेस लागतील. म्हणजे जो merchant/ दुकानदार wallet मध्ये पैसे स्वीकारतो, त्यालाच चार्जेस लागतील; पण वर म्हटल्याप्रमाणे जर तोच merchant हे पैसे थेट त्याच्या बँक खात्यात स्वीकारतो, तर त्याला चार्जेस नाहीत. हे चार्जेस merchant category प्रमाणे 0.5 ते 1.1% आहेत.

लोक नेहमीच्या सवयीने खरेदीला जातांना बरोबर कॅश नेणार नाहीत. काही दुकानदार एक एप्रिल नंतर म्हणतील, "UPI ने पैस दिले तर आम्हाला चार्जेस पडतात, म्हणून जास्तीचे 1% द्या" अशा थापांना / अफवांना बळी पडू नका. सोबत NPCI चे प्रेस रिलीज देत आहे.

- CA Pratik Damle

9822339714




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पगारदार व्यक्तींसाठी

Women's Day 2021

GST Basics