पगारदार व्यक्तींसाठी

#NewOrOld
"CA साहेब, पगारातून खूप income टॅक्स कट होतो, काहीतरी उपाय सांगा!"
तुम्ही जर पगारदार असाल, तर हे वाक्य तुमच्या CA ला कधीतरी म्हटलं असेल, आणि जर CA किंवा टॅक्स कन्सल्टंट असाल, तर हे वाक्य अनेकदा तुमच्या कानी पडलं असेल! त्यात आता एप्रिल महिना चालू आहे, आणि नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात सर्व employer किंवा त्यांचे HR डिपार्टमेंट सर्व employees ना इमेल पाठवून सांगत आहेत-
Please select either New regime or Old regime of taxation; if no option is selected, New regime will be opted by default.
तर थोडक्यात हा प्रकार असा आहे-
आत्तापर्यंत टॅक्स प्रणाली अशी होती, की तुमच्या एकूण उत्पन्नातून तुम्ही केलेल्या काही विशिष्ट गुंतवणुकी (PPF, EPF, ULIP, LIC) किंवा काही खर्च (मुलांची शाळा/ कॉलेज फी) इ. या सगळ्याची वजावट दिली जात असे. पण सगळ्याच भरलेल्या रिटर्न मधील हे claim तपासणे टॅक्स खात्याला अशक्यच! म्हणून मग काही लोक खोटे claim करून कर चुकवू लागले. त्याच बरोबर हे ही तितकंच खरं, की आता जमाना बदलला आहे. सध्या बऱ्याच लोकांचा बचत करण्याकडे, त्यात ही पाच-पाच वर्षे अडकून राहणाऱ्या गोष्टीत गुंतवणूक करण्याकडे कल कमी होतांना दिसतो. मग या दोन्ही वर इलाज म्हणून सरकारने ही New regime आणली.
या new regime मध्ये जवळजवळ सगळ्याच वजावटी काढून टाकल्या. आणि त्यामुळे अर्थातच टॅक्स रेट कमी केले गेले, जेणेकरून एकूण कर साधारण तितकाच, किंवा old regime पेक्षा कमी येईल- पण महत्त्वाची बाब म्हणजे, आता कुठले खोटे claim करणे नाही!
थोडक्यात- Old regime- वजावटी, deduction मिळतील, पण टॅक्स रेट जास्त; New regime- वजावटी नाहीत, पण टॅक्स रेट कमी.
तर मग इथे तुमचा प्रश्न येतो की आमच्या HR डिपार्टमेंटला आम्ही काय सांगू, Old का new regime?
जे लोक statistics चा अभ्यास करतात, त्यांनी ओळखलं असेल- प्रत्येक करदात्यासाठी अशी एक विशिष्ट वजावटींची रक्कम असेल, जिथे Old आणि new regime दोन्हीमध्ये सारखाच कर बसेल. उदा- sample 1 मधले टॅक्स calculation बघा- उत्पन्न आहे रु. ९ लाख, गुंतवणुकी, वजावटी आहेत रु.२,३७,५००- या फक्त old regime मध्येच claim करता येतील. तर या पातळीला old आणि new regime दोन्हीमध्ये कर सारखाच आला आहे.


हेच विश्लेषण वेगवेगळ्या Income साठी करून एक तक्ता सोबत दिलेला आहे- या तक्त्यात एका प्रश्नाचे उत्तर दिले आहे- किती गुंतवणूक केलेली असली, तर old regime निवडणे फायद्याचे ठरेल? जर केलेली टॅक्स saving गुंतवणूक या रकमेपेक्षा कमी असेल, तर तुम्ही new regime निवडणे फायद्याचे ठरेल. तर तक्ता बघा आणि योग्य ते declaration आपल्या कंपनीत सादर करा.


- CA प्रतिक दामले
9822339714



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Job change Taxation

डिप्रेशन