नवीन आर्थिक वर्ष

#NewFinancialYear

लोक नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतांना "नवे वर्ष, नवी पहाट, नवी किरणे, नव्या आशा" असं काही काव्यात्मक लिहितात. पण Finance क्षेत्रातील मंडळी म्हटली की ती फार नीरस, रुक्ष, गद्य प्रकारची असतात, असा एक प्रचलित समज आहे. मग नवीन आर्थिक वर्षाच्या शुभेच्छा देतांना ही या समजाला धक्का का लावावा? म्हणूनच "तुम्हा सर्वांना नवीन आर्थिक वर्ष भरभराटीचे व उन्नतीचे जावो, व तुमचे उत्पन्न टॅक्स व surcharge च्या सर्वोच्च स्लॅब मध्ये पोहोचू दे" या आमच्याकडून कोणतेही यमक न जुळवता गद्य शुभेच्छा!

आमच्याकडे काही अती उत्साही मंडळी असतात, जी लगेच एक एप्रिल लाच विचारतात, "कधी भरायचं या वर्षीचं रिटर्न?" पण लक्षात घ्या की बँका, पोस्ट ऑफिस व इतर करकपात करणाऱ्यांना केलेल्या करकपातीचा तपशील (TDS रिटर्न) भरण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२३ आहे. त्यांनी ही माहिती भरून पोर्टलला दिसेपर्यंत १०- १५ जून येईल. त्यामुळे त्याआधी ही माहिती न तपासता रिटर्न दाखल करणे धोकादायकच! सध्या तरी आर्थिक वर्षाची बँक स्टेटमेंट, लोन स्टेटमेंट, टॅक्स सेविंग पावत्या इ. कागदपत्रे फक्त गोळा करून ठेवावीत.

आता पाहुयात आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या रिटर्न फॉर्म मध्ये काय काय महत्त्वाचे बदल झाले आहेत-

१. Income from Salaries व Income from Other sources या खाली "Income from retirement benefit accounts" असे नवीन heading देण्यात आले आहे. त्यामुळे नोकरी चालू असतांना चे उत्पन्न व retirement नंतरचे उत्पन्न हे नीट भरणे अपेक्षित आहे.

२. Virtual Digital Assets- Crypto currency, NFT इत्यादी मधील उत्पन्न हे वेगळे भरणे अपेक्षित आहे.

३. Donation reference number- गेल्या वर्षी पर्यंत कलम 80G खालील डोनेशन मध्ये लोक वाटेल त्या रकमा भरून सूट मिळवत होते. पण या वर्षीपासून तुम्ही ज्या संस्थेला दान दिले त्यांच्याकडून फॉर्म 10BE जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घ्यावा लागेल, व त्यातील डोनेशन reference क्रमांक रिटर्न फॉर्म मध्ये टाकावा लागेल, अन्यथा ही सूट मिळणार नाही. (ट्रस्ट, धर्मादाय संस्था इ. यांना वर्षभरात प्राप्त झालेल्या देणग्यांचा तपशील भरण्याची अंतिम तारीख ३१ मे आहे. त्यानंतर ते तुम्हाला फॉर्म 10BE देतील.)

४. Turnover and income from intraday trading- जर तुम्ही Intraday ट्रेडिंग करत असाल, तर आत्तापर्यंत त्यातील फक्त नफा किंवा तोटा हा रिटर्न फॉर्म मध्ये भरला जात होता. पण आता त्यातील turnover ही भरणे आहे.

तर, पुन्हा एकदा सर्वांना नवीन आर्थिक वर्षाच्या शुभेच्छा!

- CA प्रतिक दामले

9822339714

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Job change Taxation

पगारदार व्यक्तींसाठी

डिप्रेशन