Taxation Of Professionals
साधारणतः कंपन्या कोणालाही कामावर ठेवण्यासाठी मुलाखती घेतात, आणि व्यक्ती त्यांच्या दृष्टीने अनुरूप वाटली, तर मग नोकरीवर ठेवतात. अशा व्यक्तीला payroll वर घेतले तर तो "employee" होतो, व त्याला PF, ESI, PT, Gratuity इ. सर्व कायदे लागू होतात. पण अलीकडे "trend" जरा बदलला आहे. व्यक्तीला वरील प्रमाणे जर payroll वर घेतले तर हे भरमसाठ कायदे पाळावे लागतात; म्हणून त्यांना करारावर म्हणजेच contract वर घेण्याची नवीन पद्धत हल्ली रुजू झाली आहे.
Contract वरील व्यक्ती ही त्या कंपनीची employee नसून स्वतंत्र contractor किंवा professional आहे, असे धरले जाते. त्यामुळे अशा व्यक्तीला दिलेला मोबदला हा पगार नसून, मानधन किंवा professional fees असतात. या professional fees देतांना त्या कंपन्या आयकर कायद्याच्या कलम 194J अंतर्गत 10% करकपात करतात. अशा professional fees संदर्भात साधारणपणे आम्हाला विचारण्यात येणाऱ्या शंका व त्यांचे स्पष्टीकरण खाली देत आहे-
१. आम्हाला महिन्याला फक्त ७-८ हजारच मिळतात पण त्यातून ही 10% कपात करतात, असे का?
तुम्ही पगारदार असता, तेव्हा तुमच्या tax saving गुंतवणूकींची तुम्हाला वजावट मिळते, व तुमच्या टॅक्स स्लॅब प्रमाणे कर बसतो. पण आता तुम्ही employee नाही, त्यामुळे वार्षिक रक्कम जर रु. ३०,००० हुन अधिक असेल, तर थेट १०% करकपात होईल. कोणतीही tax saving गुंतवणूक कंपनी ग्राह्य धरणार नाही. अशी काही गुंतवणूक तुम्ही केली असेल, तर ITR दाखल करतांना थेट तिथेच दाखवावी लागेल.
२. आम्हाला फॉर्म १६ दिला नाही?
पगारदार असतांना कंपनी साधारण जून महिन्यात फॉर्म १६ भाग A व भाग B देते, पण professional fees साठी दर तिमाही संपल्यानंतर ३० दिवसात, व शेवटच्या तिमाहिसाठी ३१ मेच्या आत, ही रक्कम तुमच्या PAN वर जमा करायची असते. त्यांनी ही रक्कम जमा केली आहे की नाही, हे तुम्ही तुमच्या Income Tax login मध्ये फॉर्म २६AS मध्ये तपासू शकता.
३. १०% आम्हाला सगळा refund मिळेल का?
असे universal, सगळ्यांना लागू पडेल, असे या प्रश्नाचे उत्तर नाही. ते तुमच्या उत्पन्नावर व गुंतवणुकीवर अवलंबून असते.
४. आमचे ITR पगारदार व्यक्तीपेक्षा वेगळे असेल का?
अर्थातच! पगारदार व्यक्ती ITR 1 दाखल करतात- जो साधा, सरळ फॉर्म असतो, पण तुम्हाला ITR 3 किंवा 4 भरावा लागेल- जो तुलनेने लांब व क्लिष्ट असतो. आणि त्यामुळे अर्थातच तुमचा CA, टॅक्स consultant पगारदार ITR पेक्षा फी ही जास्तच घेईल.
५. कलम 44AD काय प्रकार आहे?
आयकर कायद्यात कलम 44AD नुसार जर तुम्ही या professional category मध्ये असाल आणि वार्षिक रु. ५० लाखापेक्षा कमी मिळवत असाल, तर कोणतेही हिशेब, बिले इ. न ठेवता तुमच्या एकूण मिळालेल्या रकमेच्या किमान ५०% तुम्ही तुमचे उत्पन्न जाहीर करू शकता व त्यावर कर भरू शकता. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला एखाद्या कंपनीने रु. १२ लाख professional fee च्या रुपात दिले, तर त्यावर खर्च वजा जाऊन तुम्ही किमान रु.६ लाख उत्पन्न जाहीर करू शकता.
६. हिशेब न देता ५०% उत्पन्नावर टॅक्स? चांदीच आहे या professional लोकांची!
असे अजिबात नाही. आपण अनेक बातम्यांमध्ये बघत असाल, "बेहिशेबी मालमत्तेबद्दल अमक्याला अटक" तर हे बेहिशेबी मालमत्ता म्हणजे नेमकं काय? तर ITR मध्ये उत्पन्न जाहीर केलं रु. ३ लाख आणि फिरतोय बिन कर्जाच्या मर्सिडीज मधून! थोडक्यात, जर वरील मुद्द्यानुसार तुम्ही फक्त रु. ६ लाखच उत्पन्न जाहीर केलंत, आणि त्यासमोर त्याहून अधिक मालमत्ता जमवली असेल, तर आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवू शकते. ५०% हे किमान उत्पन्न जाहीर करायचे आहे, म्हणजे फक्त ५० टक्केच उत्पन्न जाहीर करायचे, असे नाही- जर तुमचे खरे उत्पन्न जास्त असेल, तर तेच जाहीर करणे अपेक्षित आहे.
७. पण आम्हाला हाताखाली लोकं ठेवावी लागतात, व उत्पन्न तर १०% ही नसते. तरी आम्ही ५०% उत्पन्न जाहीर करायचे?
ही काही व्यावसायिकांची खरी परिस्थिती आहे. अशा लोकांना त्यांच्या व्यवसायाचे काटेकोरपणे हिशेब ठेवून CA द्वारे audit करून घेणे बंधनकारक आहे. अशाप्रकारे ऑडिट केले असता किमान ५०% उत्पन्नाची अट लागू राहत नाही.
८. आम्ही कर्जासाठी बँकेत गेलो तर आम्हाला balance sheet व profit and loss मागितले. हे काय आहे?
पगारदार लोकांकडून बँका फॉर्म १६ व पगाराची स्लिप मागतात. पण व्यावसायिकांकडून balance sheet व profit and loss मागतात. यात तुमच्या नावावरील सर्व मालमत्ता, गुंतवणूक इ. चा व तुमच्या व्यवसायाच्या जमा- खर्चाचा तपशील असणे अपेक्षित आहे. "CA साहेब, द्या असंच काहीतरी बनवून" असं चालत नाही. त्यामुळे ही दोन कागदपत्रे हवी असल्यास योग्य माहिती, वेळ व फी CA ला देण्याची तयारी हवी!
वर फक्त Basic काही मुद्दे दिले आहेत. आपले ITR भरतांना आपल्या CA ला पूर्ण माहिती देऊन वैयक्तिक तुमच्या केस प्रमाणे सल्ला घ्यावा व मगच पुढे जावे.
- CA प्रतिक दामले
9822339714
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा