पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डिप्रेशन

 ही post डिप्रेशन बद्दल आहे.  टायटल वाचूनच काहींनी लगेच, "हे आपल्या कामाचं नाही", "हे विदेशी फॅड आहे", "आमचे मन खंबीर आहे, आम्हाला नाही येत डिप्रेशन" वगैरे प्रतिक्रिया दिल्या असतील. पण कोणी कितीही नाकारलं, तरी केवळ लोकडाऊन मधलाच नाही, तर डिप्रेशन हा कायमचाच खरा मानसिक आजार आहे. लोकडाऊन मध्ये घरात बसून काही लोक अजूनच डिप्रेशन मध्ये जाऊन आत्महत्येपर्यंत पोहोचले. फक्त नट-नट्या नाही, तर सामान्य लोक देखील. पण अनेकदा फक्त लोक काय म्हणतील, आपल्याला कमजोर समजतील का?, असे विचार मनात येऊन आपण आपल्याला किंवा आपल्या जवळच्यांना डिप्रेशन आले आहे, हे मान्य करायला तयार नसतो. *डिप्रेशन येणे हे नॉर्मल आहे* , हे आधी सगळ्यांना शिकवलं गेलं पाहिजे. मी सुरुवातीलाच उघडपणे मान्य करतो, आयुष्यात एका क्षणी मला ही डिप्रेशन आले होते आणि आधी मला ही लोक काय म्हणतील हाच विचार आला होता. पण कालांतराने जवळच्या लोकांच्या संवादातून परिस्थिती सुधारली. सुदैवाने आत्महत्या वगैरे विचारापर्यंत मजल गेली नाही. पण आजही असे कित्येक लोक आहेत, जे "डिप्रेशन वगैरे काही नसतं, सगळे मनाचे खेळ आहेत, नाटकं

LTA Scheme F Y 20-21

 पगारदार व्यक्तींसाठी विशेष करसवलत आर्थिक वर्ष 20-21 मध्ये साधारणपणे सर्व नोकरदार वर्गाला लिव्ह ट्रॅव्हल अलावंस म्हणजेच LTA दिला जातो व त्याचा वापर करून जर आपल्या परिवराबरोबर पर्यटनावर खर्च केला तर कर सवलत मिळते. पण या वर्षी कोरोनामुळे प्रवास शक्य नसल्याने ही सूट मिळवण्याकरता ऑक्टोबर 2020 मध्ये सरकारने एक स्कीम आणली आहे: 1. 12 ऑक्टोबर 20 ते 31 मार्च 21 दरम्यान 12% किंवा अधिक GST असलेल्या वस्तू खरेदी कराव्या लागतील 2. खरेदीचे tax invoice आवश्यक व त्यावर विक्रेत्याच्या GST क्रमांक आवश्यक 3. Invoice स्वतः किंवा घरातील व्यक्तीच्या नावे चालेल 4. पेमेंट हे डिजिटल माध्यमातून झालेले हवे 5. LTA च्या 3 पट खर्च केल्यास तो पूर्ण माफ होईल; कमी खर्च झाल्यास खर्चाच्या 1/3 करमुक्त होईल 6. जास्तीत जास्त 36000 प्रती व्यक्ती ची सूट मिळू शकेल शंका असल्यास संपर्क CA प्रतिक दामले 9822339714

Eclipse

 ही पोस्ट सुरू करण्याआधी मला हे नमूद करायचे आहे की माझी देवावर नितांत श्रद्धा आहे. ऋषीमुनींनी सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी बरोबर, किंवा सगळ्याच चूक असे मी मुळीच मानीत नाही. तसेच कोणीतरी सांगितले, म्हणून मी केले अशी वृत्ती माझ्या मनाला पटत नाही. ग्रहणात अमुक करा, करू नका अशा पोस्टचं पीक आज उगवलंय! पण त्या अमुक गोष्टी का करू, किंवा करू नको, असे विचारल्यावर लगेच "तुला पटत नसेल तर कर तुला हवं ते, फालतू प्रश्न विचारू नकोस" असे आम्हाला हाकलून लावण्यात येते. पण आम्हीही science + religion, दोन्ही घेऊन पुढे जाऊ इच्छितो. तुम्ही सांगणार नाही, मग आम्हीच research करू! प्रत्येक गोष्टीला काही scientific basis मिळाला तर नक्की पाळू! 1. ग्रहणात अन्न खराब होते- पृथ्वीवरील झाडे व अन्नधान्य ही चंद्राच्या cycle मुळे वाढतात व बहरतात. चंद्र साधारण 14 दिवस प्रत्येकी शुक्ल व कृष्ण पक्षात असतो. त्यामुळेच अन्नात microbes आणि bacteria वाढतात. पण ग्रहणात हे 28- 29 दिवसांचे cycle 3- 4 तासात पूर्ण होते. म्हणून ग्रहणात अन्न लवकर खराब होते. हा शोध आपल्या ऋषीमुनींनी 5- 10 हजार वर्षांपूर्वीच लावला. पण एक लक्षात

Women's Day 2021

 ते सगळं आमचे हे बघतात! वरचे वाक्य वाचून गालातल्या गालात हसलात का? पण तुम्ही एकटे नाही आहात. कित्येक घरांमध्ये बायकांच्या तोंडून हे वाक्य ऐकू येतं. याचा शिक्षणाशीही संबंध नाही. सुशिक्षित व अगदी IT मधल्या बायका पण हे वाक्य बोलतात. उद्या महिला दिन, म्हणून महिला सक्षमीकरण इ. मोठे शब्द उद्या ऐकायला मिळतील. पण आर्थिक गोष्टींबद्दल विचारलं, तर त्या गोष्टी पुरुषच हाताळतात, असं पाहण्यात आलं आहे. मी काही तज्ञ वगैरे नाही, पण गेल्या 9 वर्षात CA म्हणून फायनान्शियल प्लॅनिंगसाठी येणाऱ्या कित्येक केस मधले काही मुद्दे इथे सांगत आहे, आपणास योग्य वाटले तर जरूर अंमलात आणा: 1. Emergency instructions: नवरा अचानक गेला तर काय? आता गेला, म्हणजे मरणच आलं असे नाही. Accident झाला, divorce झाला, बाहेरगावी गेला आणि फोन लागत नाही, मग काय कराल? आपल्या नवऱ्याच्या कुठे आणि किती इन्व्हेस्टमेंट आहेत, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे का, असली तर ती कोणाकडे, agent कोण? हे बायकांना माहीत नाही. याचसाठी आम्ही सांगतो, मी नसलो तर काय आणि कसं करायचं हे सांगणारा एक सीलबंद लिफाफा "emergency instructions" म्हणून प्रत्येक घरात अस