पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Taxation Of Professionals

साधारणतः कंपन्या कोणालाही कामावर ठेवण्यासाठी मुलाखती घेतात, आणि व्यक्ती त्यांच्या दृष्टीने अनुरूप वाटली, तर मग नोकरीवर ठेवतात. अशा व्यक्तीला payroll वर घेतले तर तो "employee" होतो, व त्याला PF, ESI, PT, Gratuity इ. सर्व कायदे लागू होतात. पण अलीकडे "trend" जरा बदलला आहे. व्यक्तीला वरील प्रमाणे जर payroll वर घेतले तर हे भरमसाठ कायदे पाळावे लागतात; म्हणून त्यांना करारावर म्हणजेच contract वर घेण्याची नवीन पद्धत हल्ली रुजू झाली आहे. Contract वरील व्यक्ती ही त्या कंपनीची employee नसून स्वतंत्र contractor किंवा professional आहे, असे धरले जाते. त्यामुळे अशा व्यक्तीला दिलेला मोबदला हा पगार नसून, मानधन किंवा professional fees असतात. या professional fees देतांना त्या कंपन्या आयकर कायद्याच्या कलम 194J अंतर्गत 10% करकपात करतात. अशा professional fees संदर्भात साधारणपणे आम्हाला विचारण्यात येणाऱ्या शंका व त्यांचे स्पष्टीकरण खाली देत आहे- १. आम्हाला महिन्याला फक्त ७-८ हजारच मिळतात पण त्यातून ही 10% कपात करतात, असे का? तुम्ही पगारदार असता, तेव्हा तुमच्या tax saving गुंतवणूकींची तुम्ह

GST Basics

#GSTBasics २०१७ मध्ये GST कायदा लागू झाला. तेव्हापासून त्यात इतके बदल झाले, इतके circular, notification आले की CA नी गच्च भरलेल्या auditorium मधल्या सगळ्यांची बोटं ती मोजायला घेतली, तरी कमी पडतील! असे असून सुद्धा समाजात, खास करून व्यवसाय करणाऱ्यांमध्ये याबद्दलच्या basic गोष्टींबद्दलच अफाट गैरसमज आहेत. म्हणूनच GST तील क्लिष्ट किंवा न्यायप्रविष्ट गोष्टींबद्दल चर्चा न करता, अगदी मूळ गोष्टींची या लेखात मांडणी केली आहे. त्यामुळे बरेच लोक म्हणतील, "यात काय नवीन, हे तर आम्हाला माहीत आहे सगळं!" १. GST calculation- यात समजण्यास काहीच अवघड नाही. मी एखादी वस्तू १००० ला खरेदी केली व त्यावर १८% GST १८०/- इतका दिला. तीच वस्तू मी २००० ला विकली व त्यावर १८% ३६०/- माझ्या ग्राहकाकडून वसूल केला. तर मग सरकारला मी विक्रीवरील ३६० वजा खरेदीवरील १८० = १८० इतके देणे लागतो. २. GST नोंदणी कधी करू? काही विशिष्ट राज्य वगळून बऱ्याच राज्यात- तुम्ही जर फक्त खरेदी-विक्री किंवा उत्पादन क्षेत्रात असाल (म्हणजे फक्त goods) तर रु. ४० लाख वार्षिक उलाढाल होईपर्यंत व जर सेवा क्षेत्रात असाल किंवा वस्तू + सेवा अशा क्ष

पगारदार व्यक्तींसाठी

इमेज
#NewOrOld "CA साहेब, पगारातून खूप income टॅक्स कट होतो, काहीतरी उपाय सांगा!" तुम्ही जर पगारदार असाल, तर हे वाक्य तुमच्या CA ला कधीतरी म्हटलं असेल, आणि जर CA किंवा टॅक्स कन्सल्टंट असाल, तर हे वाक्य अनेकदा तुमच्या कानी पडलं असेल! त्यात आता एप्रिल महिना चालू आहे, आणि नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात सर्व employer किंवा त्यांचे HR डिपार्टमेंट सर्व employees ना इमेल पाठवून सांगत आहेत- Please select either New regime or Old regime of taxation; if no option is selected, New regime will be opted by default. तर थोडक्यात हा प्रकार असा आहे- आत्तापर्यंत टॅक्स प्रणाली अशी होती, की तुमच्या एकूण उत्पन्नातून तुम्ही केलेल्या काही विशिष्ट गुंतवणुकी (PPF, EPF, ULIP, LIC) किंवा काही खर्च (मुलांची शाळा/ कॉलेज फी) इ. या सगळ्याची वजावट दिली जात असे. पण सगळ्याच भरलेल्या रिटर्न मधील हे claim तपासणे टॅक्स खात्याला अशक्यच! म्हणून मग काही लोक खोटे claim करून कर चुकवू लागले. त्याच बरोबर हे ही तितकंच खरं, की आता जमाना बदलला आहे. सध्या बऱ्याच लोकांचा बचत करण्याकडे, त्यात ही पाच-पाच वर्षे अडकून र

आर्थिक शिक्षण- मुलांसाठी

आता लवकरच मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील. सुट्ट्यांचे नियोजन हे बरेच पालक आधीच करून ठेवतात. म्हणजे कुठले डोंगर चढायचे आणि कुठल्या दरीत उडी मारायची- हे सगळं ठरलेलं असतं! पण शाळेतल्या मुलांना, विशेषतः १२ ते १५ वय असलेल्यांना पैशाविषयी काही शिकवावे, असे फार कमी पालकांना वाटते. खास या वयोगटातील मुलांसाठी हा लेख! कुठल्याही teenager ला एखादी गोष्ट समजावतांना त्यांचा पहिला प्रश्न असतो, "हे शिकून आम्हाला काय करायचंय?" तर लक्षात घ्या, मोठे होणे किंवा जबाबदार होणे, असे कोणाच्याही डोक्यामागे बटन नसते; की ते दाबले आणि मुलाचा माणूस झाला. आत्ता खिशात दमडी ही नसतांना या गोष्टी नीट शिकाव्यात- काय करावे, तसेच काय करू नये; म्हणजे जेव्हा पुढे जाऊन आयुष्यात पैसा हातात येईल, तेव्हा हे ज्ञान वापरता येईल. तसेच, या वयातील मुलांना त्यांना "लहान" म्हटलेलं अजिबात आवडत नाही. पैसा हाताळणे हा देखील "मोठे" होण्याचाच एक भाग आहे. म्हणून हे ज्ञान आवश्यक. आयुष्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न- मी कोण आहे? काळजी नसावी- आपण अध्यात्माविषयी नाही, पैशाविषयीच बोलत आहोत. पैशाबद्दल विचार करतांना

नवीन आर्थिक वर्ष

#NewFinancialYear लोक नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतांना "नवे वर्ष, नवी पहाट, नवी किरणे, नव्या आशा" असं काही काव्यात्मक लिहितात. पण Finance क्षेत्रातील मंडळी म्हटली की ती फार नीरस, रुक्ष, गद्य प्रकारची असतात, असा एक प्रचलित समज आहे. मग नवीन आर्थिक वर्षाच्या शुभेच्छा देतांना ही या समजाला धक्का का लावावा? म्हणूनच "तुम्हा सर्वांना नवीन आर्थिक वर्ष भरभराटीचे व उन्नतीचे जावो, व तुमचे उत्पन्न टॅक्स व surcharge च्या सर्वोच्च स्लॅब मध्ये पोहोचू दे" या आमच्याकडून कोणतेही यमक न जुळवता गद्य शुभेच्छा! आमच्याकडे काही अती उत्साही मंडळी असतात, जी लगेच एक एप्रिल लाच विचारतात, "कधी भरायचं या वर्षीचं रिटर्न?" पण लक्षात घ्या की बँका, पोस्ट ऑफिस व इतर करकपात करणाऱ्यांना केलेल्या करकपातीचा तपशील (TDS रिटर्न) भरण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२३ आहे. त्यांनी ही माहिती भरून पोर्टलला दिसेपर्यंत १०- १५ जून येईल. त्यामुळे त्याआधी ही माहिती न तपासता रिटर्न दाखल करणे धोकादायकच! सध्या तरी आर्थिक वर्षाची बँक स्टेटमेंट, लोन स्टेटमेंट, टॅक्स सेविंग पावत्या इ. कागदपत्रे फक्त गोळा करून ठेवावीत. आत