Eclipse

 ही पोस्ट सुरू करण्याआधी मला हे नमूद करायचे आहे की माझी देवावर नितांत श्रद्धा आहे. ऋषीमुनींनी सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी बरोबर, किंवा सगळ्याच चूक असे मी मुळीच मानीत नाही. तसेच कोणीतरी सांगितले, म्हणून मी केले अशी वृत्ती माझ्या मनाला पटत नाही. ग्रहणात अमुक करा, करू नका अशा पोस्टचं पीक आज उगवलंय! पण त्या अमुक गोष्टी का करू, किंवा करू नको, असे विचारल्यावर लगेच "तुला पटत नसेल तर कर तुला हवं ते, फालतू प्रश्न विचारू नकोस" असे आम्हाला हाकलून लावण्यात येते. पण आम्हीही science + religion, दोन्ही घेऊन पुढे जाऊ इच्छितो. तुम्ही सांगणार नाही, मग आम्हीच research करू! प्रत्येक गोष्टीला काही scientific basis मिळाला तर नक्की पाळू!


1. ग्रहणात अन्न खराब होते- पृथ्वीवरील झाडे व अन्नधान्य ही चंद्राच्या cycle मुळे वाढतात व बहरतात. चंद्र साधारण 14 दिवस प्रत्येकी शुक्ल व कृष्ण पक्षात असतो. त्यामुळेच अन्नात microbes आणि bacteria वाढतात. पण ग्रहणात हे 28- 29 दिवसांचे cycle 3- 4 तासात पूर्ण होते. म्हणून ग्रहणात अन्न लवकर खराब होते. हा शोध आपल्या ऋषीमुनींनी 5- 10 हजार वर्षांपूर्वीच लावला. पण एक लक्षात ठेवा- त्याकाळी फ्रिज, microwave इ. उपकरणे नव्हती. आज ती आहेत, तर फ्रिजमध्ये अन्न ठेवले असता, ते ग्रहण आले म्हणून खराब झाले असेल, असे समजून फेकून देऊ नका! आजही कित्येक लोक उपासमारीने मरत आहेत, हे स्मरणात असू द्या.


2. ग्रहणात अन्न ग्रहण करू नये, शक्यतो जल प्राशन करावे- ग्रहण काळात पृथ्वी ही प्रचंड vibrations देत असते. ही डोळ्यांना दिसत नसली, तरी शरीरावर त्याचा परिणाम नक्कीच होत असतो. शिवाय ग्रहण काळ हा बऱ्याच लोकांना उदासीन करतो व नैराश्य आणू शकतो. आधीच इतका शारीरिक व मानसिक ताण असतांना पचनक्रियेचा ताण शरीरावर देऊ नये, म्हणून जल प्राशन किंवा अगदी हलका आहार घ्यावा. पचण्यास जड अन्न तर नक्कीच टाळावे! रविवार चे चिकन, मटण बेत तर नक्कीच टाळावेत!


3. ग्रहणात नामस्मरण करावे- वर म्हटल्याप्रमाणे ग्रहणात मानसिक ताण वाढतो. एकाजागी स्थिर बसावे, व ध्यान लावून देवाचे नाव घ्यावे. पण आजच्या पिढीतले बरेच लोक हे एकतर नास्तिक आहेत, किंवा मूर्तीपूजा, नामस्मरण इ. मुळीच मानीत नाहीत. हरकत नाही. त्यांनी हवं तर त्यांच्या भाषेतील "meditation" करावे. देव नाही तर गुरू किंवा आई यांचे नामस्मरण करावे. मनःशांती मिळणे हा मूळ उद्देश आहे, हे लक्षात ठेवावे.


त्यामुळे आज ग्रहण आहे! बापरे! आता कसं होणार? असे उगीच घाबरू नये, आणि दुसऱ्याला तर मुळीच घाबरवू नये. Scientifically आणि religiously, दोन्ही जोडून सांगितले तर समोरच्याला नक्कीच पटेल!


- प्रतिक दामले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Job change Taxation

पगारदार व्यक्तींसाठी

डिप्रेशन