Women's Day 2021

 ते सगळं आमचे हे बघतात!


वरचे वाक्य वाचून गालातल्या गालात हसलात का? पण तुम्ही एकटे नाही आहात. कित्येक घरांमध्ये बायकांच्या तोंडून हे वाक्य ऐकू येतं. याचा शिक्षणाशीही संबंध नाही. सुशिक्षित व अगदी IT मधल्या बायका पण हे वाक्य बोलतात. उद्या महिला दिन, म्हणून महिला सक्षमीकरण इ. मोठे शब्द उद्या ऐकायला मिळतील. पण आर्थिक गोष्टींबद्दल विचारलं, तर त्या गोष्टी पुरुषच हाताळतात, असं पाहण्यात आलं आहे. मी काही तज्ञ वगैरे नाही, पण गेल्या 9 वर्षात CA म्हणून फायनान्शियल प्लॅनिंगसाठी येणाऱ्या कित्येक केस मधले काही मुद्दे इथे सांगत आहे, आपणास योग्य वाटले तर जरूर अंमलात आणा:


1. Emergency instructions:

नवरा अचानक गेला तर काय? आता गेला, म्हणजे मरणच आलं असे नाही. Accident झाला, divorce झाला, बाहेरगावी गेला आणि फोन लागत नाही, मग काय कराल? आपल्या नवऱ्याच्या कुठे आणि किती इन्व्हेस्टमेंट आहेत, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे का, असली तर ती कोणाकडे, agent कोण? हे बायकांना माहीत नाही. याचसाठी आम्ही सांगतो, मी नसलो तर काय आणि कसं करायचं हे सांगणारा एक सीलबंद लिफाफा "emergency instructions" म्हणून प्रत्येक घरात असलाच पाहिजे. गरज पडली तर आपला insurance agent कोण, इन्व्हेस्टमेंट consultant कोण, या महत्त्वाच्या लोकांचे फोन नंबर हाताने लिहिलेले असावेत. फोन मध्ये सेव्ह असतात, पण ऐन वेळी गेलेल्या माणसाचे फोन (ते ही आजकालचे पासवर्ड, अंगठ्याचे ठसे यांनी लॉक असलेले) उघडून हे नंबर मिळवणे कठीण जाते. या लिफाफ्यात तुमच्या लॅपटॉप चे पासवर्ड ही जमले तर ठेवावेत. अगदी IT सेक्टर मधल्या बाईचा नवरा गेला, पण त्याचा सगळा डेटा होता पासवर्ड प्रोटेकटेड लॅपटॉप मध्ये, अशा ही केसेस झाल्या आहेत.


2. मृत्युपत्र:

हा शब्द वाचला की लगेच "ही म्हातारपणी करण्याची गोष्ट" किंवा "करोडपती लोकांचे चोचले" असा टोमणा लगेच ऐकू येतो. पण किरकोळ मालमत्ता ही आपल्या पश्चात सहजरित्या आपल्या परिवाराकडे हस्तांतरित व्हावी, यासाठी मृत्युपत्र खूप आवश्यक आहे.


3. बँकिंग:

व्यवसाय करणारे बहुतेक जण कॅश धंदा करतांना दिसतात. त्या ऐवजी बँकेत चालू खाते (current account) उघडून त्याला गुगल पे/ भीम/ फोन पे सारख्या इ-पेमेंट चा जमेल तितका वापर करावा. यामुळे पुढे मागे लोन साठी अर्ज करतांना तुम्ही जितका तुमचा धंदा आहे असे म्हणता, तितका नाही, तरी 60- 70% तरी बँक अकाउंट मध्ये दिसतो. अजूनही काही जण हे ऍप वापरायला घाबरतात. फार अवघड नाही, तुमची मुलं सुद्धा तुम्हाला शिकवू शकतात.


4. बजेटिंग/ प्लॅनिंग:

वार्षिक बजेट हे फक्त देशाचं नसून तुमचं ही असायला हवं. वर्षाचे उत्पन्न धंद्यातून किती यायला हवंय, आपले मासिक खर्च काय, वार्षिक खर्च काय: जमल्यास त्यासाठी रिकरिंग खाते किंवा mutual फंड Systematic Withdrawal प्लॅन या द्वारे तरतूद करता येईल का? या प्रश्नांची उत्तरे माहिती पाहिजे. तसेच अनेक लोकांकडून आपण हे ही ऐकतो की 6 महिने पुरेल इतका emergency फंड आपल्याकडे तयार हवा.


5. GST

धंदा वाढत जातो, तसे "एका मोठ्या कंपनीची ऑर्डर मिळणार आहे, मी GST नंबर काढू का?", हा प्रश्न विचारला जातो. पण GST हा transaction based नसतो, तो PAN based असतो. म्हणजेच एकदा GST नंबर काढला की फक्त त्या कंपनी च्या धंद्यावर नाही, तर होणाऱ्या सगळ्या उलाढालीवर GST भरावा लागेल. तसेच दर महिन्यात वेळेत विवरणपत्र भरावे लागते, अन्यथा दिवसाला रु.50 दंड लागतो. त्यामुळे दूरदृष्टी ठेऊनच GST नंबर काढावा.


या संदर्भात शंका असल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा.


CA प्रतिक दामले

9822339714

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Job change Taxation

पगारदार व्यक्तींसाठी

डिप्रेशन