डिप्रेशन
ही post डिप्रेशन बद्दल आहे. टायटल वाचूनच काहींनी लगेच, "हे आपल्या कामाचं नाही", "हे विदेशी फॅड आहे", "आमचे मन खंबीर आहे, आम्हाला नाही येत डिप्रेशन" वगैरे प्रतिक्रिया दिल्या असतील. पण कोणी कितीही नाकारलं, तरी केवळ लोकडाऊन मधलाच नाही, तर डिप्रेशन हा कायमचाच खरा मानसिक आजार आहे. लोकडाऊन मध्ये घरात बसून काही लोक अजूनच डिप्रेशन मध्ये जाऊन आत्महत्येपर्यंत पोहोचले. फक्त नट-नट्या नाही, तर सामान्य लोक देखील. पण अनेकदा फक्त लोक काय म्हणतील, आपल्याला कमजोर समजतील का?, असे विचार मनात येऊन आपण आपल्याला किंवा आपल्या जवळच्यांना डिप्रेशन आले आहे, हे मान्य करायला तयार नसतो. *डिप्रेशन येणे हे नॉर्मल आहे* , हे आधी सगळ्यांना शिकवलं गेलं पाहिजे. मी सुरुवातीलाच उघडपणे मान्य करतो, आयुष्यात एका क्षणी मला ही डिप्रेशन आले होते आणि आधी मला ही लोक काय म्हणतील हाच विचार आला होता. पण कालांतराने जवळच्या लोकांच्या संवादातून परिस्थिती सुधारली. सुदैवाने आत्महत्या वगैरे विचारापर्यंत मजल गेली नाही. पण आजही असे कित्येक लोक आहेत, जे "डिप्रेशन वगैरे काही नसतं, सगळे मनाचे खेळ आहेत, नाटकं ...