पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

UPI charges

इमेज
एक एप्रिल 23 पासून UPI महागणार, आता 2000 वरच्या प्रत्येक transaction वर चार्जेस द्यावे लागणार- अशा आशयाचे मेसेज फॉरवर्ड होत आहेत. *पण हे साफ चुकीचे आहे.* एक एप्रिल 23 नंतर सुद्धा P2P म्हणजेच peer to peer व्यवहार (म्हणजे तुमच्या मित्र मंडळी, नातेवाईक यांना पैसे पाठवणे) आणि P2M म्हणजेच peer to merchant व्यवहार (म्हणजे UPI द्वारे दुकान इ. अस्थापनांना पैसे पाठवणे) यांना कोणतेही अतिरिक्त चार्जेस लागणार नाहीत. थोडक्यात *एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे UPI द्वारे पाठवित असाल, तर चार्जेस लागणार नाहीत.* फक्त जे लोक Prepaid payment instrument (जसे की wallet, गिफ्ट कार्ड) चा वापर करतात, त्यांना चार्जेस लागतील. म्हणजे जो merchant/ दुकानदार wallet मध्ये पैसे स्वीकारतो, त्यालाच चार्जेस लागतील; पण वर म्हटल्याप्रमाणे जर तोच merchant हे पैसे थेट त्याच्या बँक खात्यात स्वीकारतो, तर त्याला चार्जेस नाहीत. हे चार्जेस merchant category प्रमाणे 0.5 ते 1.1% आहेत. लोक नेहमीच्या सवयीने खरेदीला जातांना बरोबर कॅश नेणार नाहीत. काही दुकानदार एक एप्रिल नंतर म्हणतील, "UPI ने पैस दिले तर आम्हाला चार्जेस...

Women's Day 2023

इमेज
सोबत दिलेले चित्र नीट निरखून बघा. आपल्यापैकी किती लोकांनी सोन्याचे असे चकाकणारे बिस्कीट पाहिले आहे? सोन्याची झळाळी काही निराळीच असते , नाही का? आता जरा चित्राचा उजवा भाग बघा- काय सुरेख चाफ्याची फुले आहेत. आपल्यापैकी ज्यांनी चाफ्याच्या फुलांचा वास घेतला असेल, त्यांच्या डोळ्यासमोर (किंवा इथे नाकासमोर) लगेच ती आठवण आली असेल ना? आज महिला दिनानिमित्त महिला कशा सुपर वुमन आहेत, महिला कशा सगळ्या गोष्टी करू शकतात हे ठिकठिकाणी वाचायला/ ऐकायला मिळेल. पण जर एखाद्यावेळी नाहीच जमले, ही अशी सगळी कामे करणारी सुपर वुमन व्हायला, तरी निराश व्हायचे काहीही कारण नाही. या सोन्याचे बिस्कीट व चाफ्याचे फूल आठवा व देवाचा/ निसर्गाचा संदेश नीट लक्षात ठेवा- क्षणभर विचार करा- देवाच्या/ निसर्गाच्या मनात असते, तर सोन्याला चाफ्याचा सुवास देता आला नसता का? याचप्रमाणे चाफ्याला सोन्याची चमक, झळाळी देता आली नसती का? देवाला/ निसर्गाला काय अशक्य आहे? पण तसे घडलेले नाही. कारण अपूर्णत्वात ही सौंदर्य आहे, अपूर्णत्वात ही गोडी आहे! उगीचच ठिकठिकाणी बोललं गेलं "महिला सगळं करू शकतात" म्हणूनच सगळी ओझी स्वतः वाहिली पाहिजेत, ...

Job change Taxation

पूर्वीच्या काळी लोक शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागले की "अमुक कंपनीत चिकटला", असे म्हणण्याची पद्धत होती. याचे कारण असे की एकदा नोकरी लागली की सहसा लोक आजन्म तिथेच नोकरी करत आणि तिथूनच retire होत. पण आता तसे राहिलेले नाही. लोक नव्या संधी शोधतात, अधिक पगार आकर्षित करतो, किंवा दुसऱ्या एखाद्या जागी त्यांच्या गुणांना अधिक वाव मिळतो असे त्यांना वाटते. पण जॉब बदलला की हमखास राहून जाणारी गोष्ट म्हणजे त्याचा Income टॅक्सवर होणारा परिणाम. आपल्याला माहीत आहेच की सध्या टॅक्स स्लॅब असे आहेत- 0 ते 2.5 लाख 0% 2.5 ते 5 लाख 5% 5 ते 10 लाख 20% 10 लाखापुढे 30% तसेच, जर तुमचे उत्पन्न रु. 5 लाखापेक्षा खाली असेल, तर रु. 12500 चा टॅक्स रिबेट ही मिळतो व देय आयकर शून्य होतो. पगारदार व्यक्तींना रु. 50,000 चे standard deduction ही दिले जाते. उदाहरण म्हणून धरूयात की कंपनी 1 मध्ये तुमचे वार्षिक पॅकेज आहे रु. 10 लाख. तिथे तुम्ही 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर कार्यरत होतात. म्हणजे तिथला या वर्षीचा पगार झाला रु.5 लाख. मग तुम्ही 1 ऑक्टोबर पासून 31 मार्च पर्यंत कंपनी 2 जॉईन केलीत, जिथे तुमचे पॅकेज होते वार्षिक रु. ...