महाशिवरात्री
काही लोक शंकराकडे पाहून भांग प्यायला शिकली, काही चित्र-विचित्र केस करायला शिकली. काहींच्या मते, देव धर्म ही सगळी अंधश्रद्धा आहे, तर काही देवावर विश्वास ठेवतात, पण मुर्तीपुजनाला काही अर्थ नाही असे मानतात! या सगळ्यांना माझे कायम एक सांगणे असते- देव माना अथवा नको, त्याच्या वेशभूषा, रंगभूषा, कपडे इ. चे अनुकरण करा अथवा नको; पण त्यांच्या कथांमधून नेहमीच काही न काही शिकण्यासारखे असते- ते अवश्य शिका! अशीच एक कथा आहे, श्री शनि महात्म्यामध्ये - मग शनि गेला शिवापाशीं ॥ म्हणें आतां येतो तुम्हांसी ॥ तंव शंभु म्हणे आम्हांसी ॥ काय करिसी येऊनियां ॥ ३२१ ॥ परी येशील तेव्हां सांगून येणें ॥ ऐसें उभयंता झाले बोलणें ॥ मग दुसरे दिवशीं शनिनें ॥ येतों म्हणोनि सुचविलें ॥ ३२२ ॥ शंकरे ऐकोनि वचनासी ॥ क्षण एक लपला कैलासी ॥ मग वदता झाला शनिसी ॥ तुवां आमुचें काय केलें ॥ ३२३ ॥ मग शनि म्हणे महादेवा ॥ तुमचा धाक त्रिभुवनीं सर्वा ॥ मजभेणें लपलती देवाधिदेवा ॥ हे काय थोडे असे ॥ ३२४॥ ऐकोनि हास्य करी कैलासराज ॥ म्हणे धन्य तुझें उग्र तेज ॥ मग कृपा करोनी सहज ॥ आज्ञा देत शनीला ॥ ३२५ ॥ कथा- साडेसाती म्हणून येणारे शनी महाराज एकदा ...